Monday, May 12, 2008

छत्री

पावसाळ्यात छत्रीमध्ये
हात धरून जात होतो
बाहेर कोसळनारा पाउस
छत्रीमध्ये मायेची ऊब अनुभवत होतो

गोल, मोठी, काळिशी छत्री
बालपणी जमली मैत्री
कधी तिला उघडत बनवले
ढाल हॉकी स्टिक समजून मारला बॉल

रेनकोट, विंडशीटर आले
पुन्हा छत्रीला नाही बघितले
इतक्या दिवसानंतर दिसली छत्री बाबांची
उघडताच धुळ उडाली आठवणिंची

No comments: