एक All time favorate हिंदी गाणॆ ऎकतांना हे सुचले. हा प्रयत्न वेडॆपणा आहे की धाडस.
मागणॆ
आता जातांना शेवटचा हिशेब करून जा
सखे़, आपल्या प्रेमाच्या निशाण्या मिटवून जा
तुझ्या करिता लिहिल्या होत्या मी किती कविता
शाईचॆ शब्द मी परत आणले, अर्थ तुझ्याजवळच आहे
तो अर्थ बुडवून जा, प्रेमाच्या निशाण्या मिटवून जा
रानातल्या हिरव्या वाटेत बाईक सुसाट
कानात अस्पष्ट कुजबूज, माझ्या कोपर्याची लगट
रानफूलाच्या पाकळ्यात शोधत होतो तुझा स्पर्श
फुल तर सुकली मन मात्र मोहरले आहे
हा मोहोर करपून जा, प्रेमाच्या निशाण्या मिटवून जा
एक चादरीत समावण्याची दोन जीवांची धडपड
पाठीवर चांदण्यांचे प्रतिबिंब बघण्याचे माझे वेड
डोळ्यांच्या संवादात झोप बाहेर पेंगत रहायची
उशिखाली पैजण,बांगड्या अजूनही रोमांचित आहेत
सारा शृंगार घेऊन जा,प्रेमाच्या निशाण्या मिटवून जा
चिमणिच्या दातांनी चॉकलेट तोडून ओठांनी भरवणॆ
कधी लटक्या रागाने बघणे,अचानक अलगद हसणॆ
तुला आवडायची म्हणून मी फुलपाखरे पकडायचो
फुलपाखरे तर उडाली, त्यांचा रंग हाताला आहे
आठवणिंचा रंग पुसून जा, प्रेमाच्या निशाण्या मिटवून जा
आता तुला अखेरचे मागणॆ करतो
माझे श्वास स्पदंनाशी नाते तुझ्यामुळॆच जाणतो
हे नाते तोडून जा, प्रेमाच्या निशाण्या मिटवून जा
Monday, July 14, 2008
घे भरारी
घे भरारी
घे भरारी नभाला तुझी आस आहे
पाकळ्यातून फुलतील निखारे असा श्वास आहे
असतील उंच पहाड़ हे संकटांचे
स्फोटक बारुदांचा तुझ्या रक्ताला वास आहे
का काजव्यांनी कधी पेटवल्या मशाली
धग सोसती जे हात, त्यांची ती दास आहे
सुरक्षित जरी गलबते बंदरात
वादळ लाटा झेलण्याचा तयांना ध्यास आहे
“त्या” मूक प्रतिसादानॆ व्यर्थ न हो निराश
जीवनापेक्षाही का कुठले नाते खास आहे?
खबरदार श्वापद सुटली मोकाट
गाफिल जीव आवडीचा घास आहे
अक्षर गिरवण्याचे आठव बाळकडू
प्रयत्नांती अपयश, यशाचा पहिला भास आहे
चल उठ मित्रा, दे जोमाने धड़का
या भिंतीपलीकड़े तुझाच इतिहास आहे
घे भरारी नभाला तुझी आस आहे
पाकळ्यातून फुलतील निखारे असा श्वास आहे
असतील उंच पहाड़ हे संकटांचे
स्फोटक बारुदांचा तुझ्या रक्ताला वास आहे
का काजव्यांनी कधी पेटवल्या मशाली
धग सोसती जे हात, त्यांची ती दास आहे
सुरक्षित जरी गलबते बंदरात
वादळ लाटा झेलण्याचा तयांना ध्यास आहे
“त्या” मूक प्रतिसादानॆ व्यर्थ न हो निराश
जीवनापेक्षाही का कुठले नाते खास आहे?
खबरदार श्वापद सुटली मोकाट
गाफिल जीव आवडीचा घास आहे
अक्षर गिरवण्याचे आठव बाळकडू
प्रयत्नांती अपयश, यशाचा पहिला भास आहे
चल उठ मित्रा, दे जोमाने धड़का
या भिंतीपलीकड़े तुझाच इतिहास आहे
उजाडले आहे
उजाडले आहे
उगवला नाही सूर्य, तरी उजाडले आहे
नाही वसंताची चाहूल, तरी बहरले आहे
थबकल्या क्षणांनी गोंजारलित दुःखे
उमेदीने घर पुन्हा सावरले आहे
सरसावत होते हाती घेवुनी फुंकण्या
निखारेच त्यांनी आता विझवले आहे
गुलाबी आठवाणिंना होती संचारबंदी
मन तुझ्याच सभेत आता बावरले आहे
मैफलीत होते उदास गीत गाणॆ
सूर खर्जाचे आता हरवले आहे
बुरुजावरून डागल्या त्यांनी किती तोफा
आज पांढरे निशाण तेथे फडकले आहे
ऊन पावसाशी होती हरण्याची लढाई
तरी खडकाने कोंब गर्भात जगवले आहे
प्राक्तनाच्या गोळाबेरजेत हाती उरले शून्य
नियतिलाच मी आता ललकारले आहे
उगवला नाही सूर्य, तरी उजाडले आहे
नाही वसंताची चाहूल, तरी बहरले आहे
थबकल्या क्षणांनी गोंजारलित दुःखे
उमेदीने घर पुन्हा सावरले आहे
सरसावत होते हाती घेवुनी फुंकण्या
निखारेच त्यांनी आता विझवले आहे
गुलाबी आठवाणिंना होती संचारबंदी
मन तुझ्याच सभेत आता बावरले आहे
मैफलीत होते उदास गीत गाणॆ
सूर खर्जाचे आता हरवले आहे
बुरुजावरून डागल्या त्यांनी किती तोफा
आज पांढरे निशाण तेथे फडकले आहे
ऊन पावसाशी होती हरण्याची लढाई
तरी खडकाने कोंब गर्भात जगवले आहे
प्राक्तनाच्या गोळाबेरजेत हाती उरले शून्य
नियतिलाच मी आता ललकारले आहे
Thursday, June 26, 2008
रात्र गेली !
रात्र गेली !
नाजूक श्रृंगाराला सजवून रात्र गेली
गुपित तन मनाचे उसवून रात्र गेली
घरंगळत गेली नजर घाटदार वळणातुनी
कोडॆ कंचुकिच्या बंधाचे सोडवून रात्र गेली
बिछान्याच्या व्यासपिठावर सभा तरुणाईची
ठराव उन्मादाचा सुचवून रात्र गेली
तिचे बहाणे,ओठांनी नाही डोळ्यानी हो म्हणने
डावपेच मदनक्रिडॆचे शिकवून रात्र गेली
तिच्या श्वासात श्वास माझा,ओठात ओठ
तृषार्थ गात्रांना चेतवून रात्र गेली
तनुवर टिचल्या बांगड्या,व्रण दाताचे गाली
पंचनामा घटनेचा गोंदवून रात्र गेली
प्रणयाराधना चोरून बघती चन्द्र तारे
खट्याळ साक्षिदारांना मिटवून रात्र गेली
उसने मागुन रंग तिचे, उगवली पहाट
नवजात सुर्य किरणांना प्रसवून रात्र गेली
नाजूक श्रृंगाराला सजवून रात्र गेली
गुपित तन मनाचे उसवून रात्र गेली
घरंगळत गेली नजर घाटदार वळणातुनी
कोडॆ कंचुकिच्या बंधाचे सोडवून रात्र गेली
बिछान्याच्या व्यासपिठावर सभा तरुणाईची
ठराव उन्मादाचा सुचवून रात्र गेली
तिचे बहाणे,ओठांनी नाही डोळ्यानी हो म्हणने
डावपेच मदनक्रिडॆचे शिकवून रात्र गेली
तिच्या श्वासात श्वास माझा,ओठात ओठ
तृषार्थ गात्रांना चेतवून रात्र गेली
तनुवर टिचल्या बांगड्या,व्रण दाताचे गाली
पंचनामा घटनेचा गोंदवून रात्र गेली
प्रणयाराधना चोरून बघती चन्द्र तारे
खट्याळ साक्षिदारांना मिटवून रात्र गेली
उसने मागुन रंग तिचे, उगवली पहाट
नवजात सुर्य किरणांना प्रसवून रात्र गेली
बाबा आज तुम्ही आज हवे होताता
बाबा आज तुम्ही आज हवे होताता
बाबा तुमचेच बोट धरून मी चालायला शिकलो
तुम्हीच मला वाढवले, घड़वले
किती प्रश्न पडायचे त्या उमलत्या मनाला
तुमच्या ज्ञानकोषात मी उत्तर शोधयचो
बाबा मोठे कोण
टिळक की आगरकर, गांधी की आम्बेडकर?
अरे मोठयाचे वाद म्हणजे तार्यांची शर्यत
त्याचा निकाल आपल्याला कसा लावता येईल
सर्वांचाच आदर करावा आणि
आपल्याला जे पटेल त्याचे अनुसरण करावे
बाबा कुठले साहित्य चांगले
ग्रामीण की शहरी, दलित की ललित ?
जे प्रामाणिकपनाने लिहिले ते साहित्य चांगले
मुखवट्याचे साहित्य वाईट
साहित्याचे हे दोनच प्रकार, बाकी सर्व भेद झूट
बाबा धर्म म्हणजे काय? कुठला श्रेष्ट?
धर्मं म्हणजे श्रद्धा, माणुसकीवरील विश्वास
तुला मी मिलिंद म्हणतो, आई मनिष
आजी बाबू तर मित्र मिल्या म्हणतात
तसेच हिन्दू, इस्लाम, शिख, बौद्ध ही
त्या श्रध्दॆची वेगवेगळी नावे आहेत
बाबा शाळेत स्पर्धा आहे, भाषण लिहून दया!
पाठीवर हात ठेवून तुम्ही म्हणाला
अरे तुझी लढाई तुलाच लढावी लागेल
तू प्रा. लांजेवाराचा मुलगा आहे ही माझी ओळख आहे
पण तू असे काही कर की उद्या लोक म्हणतील
बघा मिलिंदचॆ वडील चालले आहेत
बाबा तुम्ही बोलत होतात आणि
मडके पक्के होत गेले
मग अचानक तुम्ही निघून गेलात
त्यावेळी माझा श्वासच थांबला होता
हो फार मोठा नव्हतो मी पण कळत होते
आता स्वतःलाच संघर्ष करावा लागेल
मी कितिदा रडलॊ, पडलो, ठेच लागून विरहळलो
पण तुमच्या दीपस्तंभात मार्ग शोधत गेलो
चालत रहिलो आणि आजही प्रवास संपला नाही
तुम्ही दिलेली शिदोरी अजूनही पुरते मला
आज नसेल हे आकाश माझे पण
या गर्दीत माझ्या नावाचा एक तारा आहे
असेल मंदसा पण स्वयंप्रकाशित आहे
ते बघायला तुम्ही हवे होतात
मी आहे म्हणजे तुम्हीही आहाताच,
तरीही आपल्या अंकुराचे झाड़ बनण्याच्या धडपडिचे
कौतूक करायला तुम्ही हवे होतात
बाबा आज तुम्ही खरेच हवे होतात
बाबा तुमचेच बोट धरून मी चालायला शिकलो
तुम्हीच मला वाढवले, घड़वले
किती प्रश्न पडायचे त्या उमलत्या मनाला
तुमच्या ज्ञानकोषात मी उत्तर शोधयचो
बाबा मोठे कोण
टिळक की आगरकर, गांधी की आम्बेडकर?
अरे मोठयाचे वाद म्हणजे तार्यांची शर्यत
त्याचा निकाल आपल्याला कसा लावता येईल
सर्वांचाच आदर करावा आणि
आपल्याला जे पटेल त्याचे अनुसरण करावे
बाबा कुठले साहित्य चांगले
ग्रामीण की शहरी, दलित की ललित ?
जे प्रामाणिकपनाने लिहिले ते साहित्य चांगले
मुखवट्याचे साहित्य वाईट
साहित्याचे हे दोनच प्रकार, बाकी सर्व भेद झूट
बाबा धर्म म्हणजे काय? कुठला श्रेष्ट?
धर्मं म्हणजे श्रद्धा, माणुसकीवरील विश्वास
तुला मी मिलिंद म्हणतो, आई मनिष
आजी बाबू तर मित्र मिल्या म्हणतात
तसेच हिन्दू, इस्लाम, शिख, बौद्ध ही
त्या श्रध्दॆची वेगवेगळी नावे आहेत
बाबा शाळेत स्पर्धा आहे, भाषण लिहून दया!
पाठीवर हात ठेवून तुम्ही म्हणाला
अरे तुझी लढाई तुलाच लढावी लागेल
तू प्रा. लांजेवाराचा मुलगा आहे ही माझी ओळख आहे
पण तू असे काही कर की उद्या लोक म्हणतील
बघा मिलिंदचॆ वडील चालले आहेत
बाबा तुम्ही बोलत होतात आणि
मडके पक्के होत गेले
मग अचानक तुम्ही निघून गेलात
त्यावेळी माझा श्वासच थांबला होता
हो फार मोठा नव्हतो मी पण कळत होते
आता स्वतःलाच संघर्ष करावा लागेल
मी कितिदा रडलॊ, पडलो, ठेच लागून विरहळलो
पण तुमच्या दीपस्तंभात मार्ग शोधत गेलो
चालत रहिलो आणि आजही प्रवास संपला नाही
तुम्ही दिलेली शिदोरी अजूनही पुरते मला
आज नसेल हे आकाश माझे पण
या गर्दीत माझ्या नावाचा एक तारा आहे
असेल मंदसा पण स्वयंप्रकाशित आहे
ते बघायला तुम्ही हवे होतात
मी आहे म्हणजे तुम्हीही आहाताच,
तरीही आपल्या अंकुराचे झाड़ बनण्याच्या धडपडिचे
कौतूक करायला तुम्ही हवे होतात
बाबा आज तुम्ही खरेच हवे होतात
बेधुंद मला
बेधुंद मला !
एकदा सुर्यालाही खिशात घालायचे मला
सखे चंद्रालाही तुझ्या गळ्यात बांधयचे मला
धर्म कर्माच्या गुंत्यात का भावना अस्पृश्य
व्यासही ओशाळतील असे महाकाव्य लिहायचे मला
यौवनाचा उन्माद , इन्द्रियांची तृष्णा
चेकाळॆल कामसूत्र असे क्षण भोगायाचे मला
कुठला तो धर्मं आणि कसले प्राक्तन
देव नाकारणार्या चार्वकाच्या कुळात जन्मायचे मला
तुझ्याच आठवणिंचे ढग माझ्या आकाशात
चांदण्यांचे ताजमहल शुक्रावर बनवायचे मला
लावा धार शस्त्राना , वाजवा तुतारी
सिकंदराचे अधुरे स्वप्न पुर्ण करायचे मला
एकदा सुर्यालाही खिशात घालायचे मला
सखे चंद्रालाही तुझ्या गळ्यात बांधयचे मला
धर्म कर्माच्या गुंत्यात का भावना अस्पृश्य
व्यासही ओशाळतील असे महाकाव्य लिहायचे मला
यौवनाचा उन्माद , इन्द्रियांची तृष्णा
चेकाळॆल कामसूत्र असे क्षण भोगायाचे मला
कुठला तो धर्मं आणि कसले प्राक्तन
देव नाकारणार्या चार्वकाच्या कुळात जन्मायचे मला
तुझ्याच आठवणिंचे ढग माझ्या आकाशात
चांदण्यांचे ताजमहल शुक्रावर बनवायचे मला
लावा धार शस्त्राना , वाजवा तुतारी
सिकंदराचे अधुरे स्वप्न पुर्ण करायचे मला
कोलाज
कोलाज
खण् खण् खण्
पैसांचा पाऊस
क्लिंग् क्लिंग् क्लिंग्
चिअर्सचा उरुस
पों पों पों
ट्रक वेगात
अs आss आ।sss
कोणी रक्ताच्या थारोळ्यात
थल् थल् थल्
उभारांच हलण
आs हाss ..आs हाss
पौरुषत्वाचे स्खलन
उ. ऊ.. ऊू...
स्मशानातिल आसव
ढिंग् ढिंग् ढिंग्
गिधाडांचे तांडव
डब् डब् डब्
गंगेची गहराई
क्टिंग् क्टिंग् क्टिंग्
स्वर्गातून उतरते आई
शू ssss ...
रात्र चढतेय
घुर्s र् घुर्s र्
मी घोरतोय
खण् खण् खण्
पैसांचा पाऊस
क्लिंग् क्लिंग् क्लिंग्
चिअर्सचा उरुस
पों पों पों
ट्रक वेगात
अs आss आ।sss
कोणी रक्ताच्या थारोळ्यात
थल् थल् थल्
उभारांच हलण
आs हाss ..आs हाss
पौरुषत्वाचे स्खलन
उ. ऊ.. ऊू...
स्मशानातिल आसव
ढिंग् ढिंग् ढिंग्
गिधाडांचे तांडव
डब् डब् डब्
गंगेची गहराई
क्टिंग् क्टिंग् क्टिंग्
स्वर्गातून उतरते आई
शू ssss ...
रात्र चढतेय
घुर्s र् घुर्s र्
मी घोरतोय
Wednesday, June 4, 2008
हुंकार
(शोषित पण जे पेटून उठलेले आहेत त्यांचा हा हुंकार आहे. ज्यांचा उद्याच्या सुर्याला आकार देण्याचा निग्रह आहे तेच स्वःताचे भविष्य लिह्तील.)
हुंदका दाबून आम्ही देऊ हुंकार
भस्म करू त्यांचा अंहकार
आजपर्यंत मांडली गार्हाणी
फरफटतच होतो अनवानी
फुंकतॊ तुतारी, ही आमची ललकार
हुंदका दाबून आम्ही देऊ हुंकार
तुमच्याकड़ेच होते गिरवी हात
लपविला सूर्य म्हणे झाली रात
उध्वस्त करू त्यांचा दरबार
हुंदका दाबून आम्ही देऊ हुंकार
वेठबिगारी आम्ही, झालो गुलाम
तुमच्या थुन्किनाही केला लवून सलाम
फुटला बांध, बघा प्रलयाचा संहार
हुंदका दाबून आम्ही देऊ हुंकार
धगधगत्या ज्वालामुखिचा उद्रेक
इतिहासा, बंडाची गर्जना ऐक
देऊ उद्याच्या सुर्याला आकार
हुंदका दाबून आम्ही देऊ हुंकार
(शोषित पण जे पेटून उठलेले आहेत त्यांचा हा हुंकार आहे. ज्यांचा उद्याच्या सुर्याला आकार देण्याचा निग्रह आहे तेच स्वःताचे भविष्य लिह्तील.)
हुंदका दाबून आम्ही देऊ हुंकार
भस्म करू त्यांचा अंहकार
आजपर्यंत मांडली गार्हाणी
फरफटतच होतो अनवानी
फुंकतॊ तुतारी, ही आमची ललकार
हुंदका दाबून आम्ही देऊ हुंकार
तुमच्याकड़ेच होते गिरवी हात
लपविला सूर्य म्हणे झाली रात
उध्वस्त करू त्यांचा दरबार
हुंदका दाबून आम्ही देऊ हुंकार
वेठबिगारी आम्ही, झालो गुलाम
तुमच्या थुन्किनाही केला लवून सलाम
फुटला बांध, बघा प्रलयाचा संहार
हुंदका दाबून आम्ही देऊ हुंकार
धगधगत्या ज्वालामुखिचा उद्रेक
इतिहासा, बंडाची गर्जना ऐक
देऊ उद्याच्या सुर्याला आकार
हुंदका दाबून आम्ही देऊ हुंकार
रंग माझा वेगळा
रंग माझा वेगळा
सुरेश भट यांच्या गझल वाचणॆ म्हणजे एक अपुर्व अनुभव आहे. त्यातही “रंग माझा वेगळा” ह्या ऒळीनॆ मला नेहमीच भुरळ घातली कारण त्या शब्दांशी माझी frequency match
होते असे सारखे वाटते. त्या ऒळीवरुन सुचलेली ही कविता.
डोळ्यात भरेल असा हा पक्का रंग आहे
वेगळ्याच वाटा चालण्याचा माझा ढंग आहे
स्वागतास माझ्या उभरता का कमानी
प्रवेश माझा वादळाच्या संग आहे
मुर्दाड या क्षणांना तुझीच आस
आठवांच्या दिंडीत आज मी दंग आहे
हुंदकॆ अन् अंश्रुची मिळकत सारी
आरश्याचा दोष काय? प्रतिबिंबच भंग आहे
षंढाच्या जमावाला तुतारिची प्रतिक्षा
शोधता कुणाला,बघा हे कलकिचे अंग आहे
डिवचता का सभ्य या मनाला
बळ मणगटात जरी तलवारिला जंग आहे
सुरेश भट यांच्या गझल वाचणॆ म्हणजे एक अपुर्व अनुभव आहे. त्यातही “रंग माझा वेगळा” ह्या ऒळीनॆ मला नेहमीच भुरळ घातली कारण त्या शब्दांशी माझी frequency match
होते असे सारखे वाटते. त्या ऒळीवरुन सुचलेली ही कविता.
डोळ्यात भरेल असा हा पक्का रंग आहे
वेगळ्याच वाटा चालण्याचा माझा ढंग आहे
स्वागतास माझ्या उभरता का कमानी
प्रवेश माझा वादळाच्या संग आहे
मुर्दाड या क्षणांना तुझीच आस
आठवांच्या दिंडीत आज मी दंग आहे
हुंदकॆ अन् अंश्रुची मिळकत सारी
आरश्याचा दोष काय? प्रतिबिंबच भंग आहे
षंढाच्या जमावाला तुतारिची प्रतिक्षा
शोधता कुणाला,बघा हे कलकिचे अंग आहे
डिवचता का सभ्य या मनाला
बळ मणगटात जरी तलवारिला जंग आहे
रूपगार्विता
रूपगार्विता
येणार्या जाणार्यांच्या खिळल्या नजरा
चारचौघीहून वेगळा एक गोड चेहरा
मिठ्ठास गालावर मिठ्ठास खळी
इवलिश्या ओठावर गुलाबाची कळी
कोकिळिचा सुर वसे गोर्यापान गळी
बघ तुझ्या नजरेचे पडले किती बळी
भुरभुरत्या केसातुनी खुणवी चाफ्याचा गजरा
चारचौघीहून वेगळा एक गोड चेहरा
चालित तिच्या असे मद्याचा घुटका
चेव आणी चित्ती असा केसांचा लटका
थांबॆल श्वास, देऊ नको मानेला झटका
नजर आड़ होताच ह्रुदयाला चटका
कमनीय देहाचा तो डौल साजरा
चारचौघीहून वेगळा एक गोड चेहरा
घेतला जणू तू तारुण्याचा मक्ता
काळजाच्या ठोक्यावर तुझीच सत्ता
चालली आहे गिरवत नागिणिचा कित्ता
येईल तुझ्या घरी विचारत चांदण्याना पत्ता
कासावीस होई मन खेळॆ ओढनिशी वारा
चारचौघीहून वेगळा एक गोड चेहरा
येणार्या जाणार्यांच्या खिळल्या नजरा
चारचौघीहून वेगळा एक गोड चेहरा
मिठ्ठास गालावर मिठ्ठास खळी
इवलिश्या ओठावर गुलाबाची कळी
कोकिळिचा सुर वसे गोर्यापान गळी
बघ तुझ्या नजरेचे पडले किती बळी
भुरभुरत्या केसातुनी खुणवी चाफ्याचा गजरा
चारचौघीहून वेगळा एक गोड चेहरा
चालित तिच्या असे मद्याचा घुटका
चेव आणी चित्ती असा केसांचा लटका
थांबॆल श्वास, देऊ नको मानेला झटका
नजर आड़ होताच ह्रुदयाला चटका
कमनीय देहाचा तो डौल साजरा
चारचौघीहून वेगळा एक गोड चेहरा
घेतला जणू तू तारुण्याचा मक्ता
काळजाच्या ठोक्यावर तुझीच सत्ता
चालली आहे गिरवत नागिणिचा कित्ता
येईल तुझ्या घरी विचारत चांदण्याना पत्ता
कासावीस होई मन खेळॆ ओढनिशी वारा
चारचौघीहून वेगळा एक गोड चेहरा
तळमळ
तळमळ - माझ्या मुली करता एक साधी कविता
छ्कुली रडू नकोस ग!
बघ मला ऑफिसला वेळ होतोय
रडतेस तू आणि हुंदका मला येतोय......
किती ताकद आहे या कोवळ्या बेड्यात
तुझी मिठी सोडवली पण पाऊल उचलतच नाही....
मला ही वाटते ऑफिसला दांडी मारून तुझ्या सोबत खेळावे
साखरेचे पोत करत तुला खूप हसवावे
पण .......
मला जावेच लागेल
मला तुझ्या भविष्याची चिंता आहेच
पुस्तके, कपडे, अन्न या सर्वांचीच
किंमत असते हे समजते मला
पण हे लंगडे समर्थन आहे.
प्रश्न केवळ पैशाचा
नाही रोज रात्री कुशीत घेऊन तुला गोष्ट सांगतो
त्याची किंमत मला महिन्यात एकदाच
मिळनार्या पगारापेक्षा जास्त आहे.
माझे काम माझी अस्मिता आहे
तेच कसे सोडू ?..... "
सत्व" नसलेल्या पुरुषाला
पुढे तुला पापा म्हणायचिही लाज वाटेल.
हे मला कळत पण.... वळत नाही
आणि तुला .....?
आज हे कळनार नाही
पण मोठी झाल्यावर हे जरुर हे वाच
मग एक पित्याची तळमळ तुला
कळॆल तेव्हा कदाचित तू मला माफही करशील
तळमळ - माझ्या मुली करता एक साधी कविता
छ्कुली रडू नकोस ग!
बघ मला ऑफिसला वेळ होतोय
रडतेस तू आणि हुंदका मला येतोय......
किती ताकद आहे या कोवळ्या बेड्यात
तुझी मिठी सोडवली पण पाऊल उचलतच नाही....
मला ही वाटते ऑफिसला दांडी मारून तुझ्या सोबत खेळावे
साखरेचे पोत करत तुला खूप हसवावे
पण .......
मला जावेच लागेल
मला तुझ्या भविष्याची चिंता आहेच
पुस्तके, कपडे, अन्न या सर्वांचीच
किंमत असते हे समजते मला
पण हे लंगडे समर्थन आहे.
प्रश्न केवळ पैशाचा
नाही रोज रात्री कुशीत घेऊन तुला गोष्ट सांगतो
त्याची किंमत मला महिन्यात एकदाच
मिळनार्या पगारापेक्षा जास्त आहे.
माझे काम माझी अस्मिता आहे
तेच कसे सोडू ?..... "
सत्व" नसलेल्या पुरुषाला
पुढे तुला पापा म्हणायचिही लाज वाटेल.
हे मला कळत पण.... वळत नाही
आणि तुला .....?
आज हे कळनार नाही
पण मोठी झाल्यावर हे जरुर हे वाच
मग एक पित्याची तळमळ तुला
कळॆल तेव्हा कदाचित तू मला माफही करशील
Monday, May 12, 2008
धुमाकूळ-काव्यांजली स्टाइल
धुमाकूळ-काव्यांजली स्टाइल
नामकाकांनी धुमाकूळ बद्दल लिहिल्यापासून धमाल काही तरी लिहावे असे वाटत होते. फिरक्या घेण्याचा स्वभाव असल्याने पाहिले नामकाकांची मुलाखत घेतली. http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=41419010&tid=2597213526190410726&na=3&nst=41&nid=41419010-2597213526190410726-2597297149255863759
तरीही खाज सुटलेली गेली नाही. प्रत्येक कविंची एक स्टाइल, शैली असते. एकाच विषयावर कवि कसे वेगवेगळॆ लिहू शकतात हे दाखवले तर मजा येईल असे वाटले. हे एक प्रकारे विडंबनच पण कवितेचे विडंबन न करता शैलीचे विडंबन केले आहे. तेही खास काव्यांजली स्टाइल. या व्यक्तिंच्या कविता मी आवडिने वाचतो आणि मला त्यांच्या बद्दल आदर आहे हे सुज्ञांना सांगनॆ न लगे. त्यामूळॆ कोणीही राग मानू नये. इथे विषय महागाईचा आहे. वेळेअभावी दोनच कविता करता आल्या. कविंचे नाव मुद्दाम दिले नाही पण no marks for guessing that. ११ तारखेच्या धुमाकूळ कार्यक्रमाला शुभेच्या.
नामकाकांनी धुमाकूळ बद्दल लिहिल्यापासून धमाल काही तरी लिहावे असे वाटत होते. फिरक्या घेण्याचा स्वभाव असल्याने पाहिले नामकाकांची मुलाखत घेतली. http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=41419010&tid=2597213526190410726&na=3&nst=41&nid=41419010-2597213526190410726-2597297149255863759
तरीही खाज सुटलेली गेली नाही. प्रत्येक कविंची एक स्टाइल, शैली असते. एकाच विषयावर कवि कसे वेगवेगळॆ लिहू शकतात हे दाखवले तर मजा येईल असे वाटले. हे एक प्रकारे विडंबनच पण कवितेचे विडंबन न करता शैलीचे विडंबन केले आहे. तेही खास काव्यांजली स्टाइल. या व्यक्तिंच्या कविता मी आवडिने वाचतो आणि मला त्यांच्या बद्दल आदर आहे हे सुज्ञांना सांगनॆ न लगे. त्यामूळॆ कोणीही राग मानू नये. इथे विषय महागाईचा आहे. वेळेअभावी दोनच कविता करता आल्या. कविंचे नाव मुद्दाम दिले नाही पण no marks for guessing that. ११ तारखेच्या धुमाकूळ कार्यक्रमाला शुभेच्या.
K हानी उर्मिलेची (एपिसोड- १००)
(आधीच्या भागाची लिंक वर दिलेली आहे.)
मी उर्मिला, विसरलात तर
पुन्हा विचारा माझे नाव
पण नका विचारू मला
कुठल्याही तेलाचे भाव
दशरथपुत्र वनवासत, मी महाली एकटी
दशननापेक्षा भयंकर या वाढत्या किंमती
सासुसासरे, अपेक्षा, कर्तव्य यांचा त्रागा
मंथरा तुझ्या कपटात का नव्हती मला जागा
शुर्पणखा नव्हे विषकन्याच ती
नाथा का ठरविले नाक कापणॆ
स्त्री जन्माची मोठी शिक्षा
नाकाने (महागडे) कांदे सोलणे
उदास श्रावण, त्यात महागाईचे दिन
कसा करू संसार, सांग रघुवर
भाग्य मैथिलिचे, खाते मुफ्तच कंदमूळ
आणि शबरीचे उष्टॆ बोर
कसा साहू विरह प्रलय
कसे साहू मुद्रास्फितिचे भय
इतिहासात नाही माझे प्रयोजन
अन् वजाबाकीत राहण्याचे हे कसले प्राक्तन
(आधीच्या भागाची लिंक वर दिलेली आहे.)
मी उर्मिला, विसरलात तर
पुन्हा विचारा माझे नाव
पण नका विचारू मला
कुठल्याही तेलाचे भाव
दशरथपुत्र वनवासत, मी महाली एकटी
दशननापेक्षा भयंकर या वाढत्या किंमती
सासुसासरे, अपेक्षा, कर्तव्य यांचा त्रागा
मंथरा तुझ्या कपटात का नव्हती मला जागा
शुर्पणखा नव्हे विषकन्याच ती
नाथा का ठरविले नाक कापणॆ
स्त्री जन्माची मोठी शिक्षा
नाकाने (महागडे) कांदे सोलणे
उदास श्रावण, त्यात महागाईचे दिन
कसा करू संसार, सांग रघुवर
भाग्य मैथिलिचे, खाते मुफ्तच कंदमूळ
आणि शबरीचे उष्टॆ बोर
कसा साहू विरह प्रलय
कसे साहू मुद्रास्फितिचे भय
इतिहासात नाही माझे प्रयोजन
अन् वजाबाकीत राहण्याचे हे कसले प्राक्तन
बेभान, स्वैर, महागाई
शरद पौर्णिमेची रात्र, मी कामातुर
तुझ्या डोळ्यात वेगळॆच “भाव”, का ती फितूर
आवडले ते "तिळ" गालावरचे ,७०रू kg का लावतेस असा सुर
डाळ तेलाच्या किमतीचा का काढ्तेस माग
अधरांना झाले आता चुम्बनही महाग
१०-२० रुपया करीता का करावा अमूल्य प्रणयरात्रीवर राग
महागाईची चिंता नको, सर्वांचा वापर काटकसरीने व्हावा
तनुवरही एवढ्या कपड्यांचा का भार असावा ?
मदनचाळॆ करताना कांदॆ बटाट्याचा विचार नसावा
ये प्रणयिनी, चांदराती एकमेकांचे हात धरु
विस्कटले कुंतल, ढळता पदर, कसे मनाला आवरु
सावरशील स्वत:ला, की मी काही मदत करू
काय म्हणतेस? सामानाची यादी बनवायला मदत करा
X X X X X X X X X X X , प्रणय भावनेचा झाला कचरा
सोकावतो आहे काळ, मी असा एकटाच बरा
शरद पौर्णिमेची रात्र, मी कामातुर
तुझ्या डोळ्यात वेगळॆच “भाव”, का ती फितूर
आवडले ते "तिळ" गालावरचे ,७०रू kg का लावतेस असा सुर
डाळ तेलाच्या किमतीचा का काढ्तेस माग
अधरांना झाले आता चुम्बनही महाग
१०-२० रुपया करीता का करावा अमूल्य प्रणयरात्रीवर राग
महागाईची चिंता नको, सर्वांचा वापर काटकसरीने व्हावा
तनुवरही एवढ्या कपड्यांचा का भार असावा ?
मदनचाळॆ करताना कांदॆ बटाट्याचा विचार नसावा
ये प्रणयिनी, चांदराती एकमेकांचे हात धरु
विस्कटले कुंतल, ढळता पदर, कसे मनाला आवरु
सावरशील स्वत:ला, की मी काही मदत करू
काय म्हणतेस? सामानाची यादी बनवायला मदत करा
X X X X X X X X X X X , प्रणय भावनेचा झाला कचरा
सोकावतो आहे काळ, मी असा एकटाच बरा
छत्री
पावसाळ्यात छत्रीमध्ये
हात धरून जात होतो
बाहेर कोसळनारा पाउस
छत्रीमध्ये मायेची ऊब अनुभवत होतो
गोल, मोठी, काळिशी छत्री
बालपणी जमली मैत्री
कधी तिला उघडत बनवले
ढाल हॉकी स्टिक समजून मारला बॉल
रेनकोट, विंडशीटर आले
पुन्हा छत्रीला नाही बघितले
इतक्या दिवसानंतर दिसली छत्री बाबांची
उघडताच धुळ उडाली आठवणिंची
हात धरून जात होतो
बाहेर कोसळनारा पाउस
छत्रीमध्ये मायेची ऊब अनुभवत होतो
गोल, मोठी, काळिशी छत्री
बालपणी जमली मैत्री
कधी तिला उघडत बनवले
ढाल हॉकी स्टिक समजून मारला बॉल
रेनकोट, विंडशीटर आले
पुन्हा छत्रीला नाही बघितले
इतक्या दिवसानंतर दिसली छत्री बाबांची
उघडताच धुळ उडाली आठवणिंची
(४) अजुनही
तुझ्या पैंजण्याचा आवाज अजुनही कानात आहे
तू लावलेला जास्वंद बहरतो आजही वनात आहे
तुझ्यासाठीच फुलवले होते शब्दांना
तुझी ओढ़ अजुनही त्या पानात आहे
विरघळत होतो पुर्णपनॆ एकमेकात
स्वाक्षर्या त्याच्या, आजही शरीराच्या कणकणात आहे
नियतिने ठरवल्या होत्या वेगळयाच वाटा
काटा रुतलेला, अजुनही मनात आहे
शोधतात डोळे पुन्हा त्या छबिला
आस तुझी, आजही प्रत्येक क्षणात आहे
तुझ्या पैंजण्याचा आवाज अजुनही कानात आहे
तू लावलेला जास्वंद बहरतो आजही वनात आहे
तुझ्यासाठीच फुलवले होते शब्दांना
तुझी ओढ़ अजुनही त्या पानात आहे
विरघळत होतो पुर्णपनॆ एकमेकात
स्वाक्षर्या त्याच्या, आजही शरीराच्या कणकणात आहे
नियतिने ठरवल्या होत्या वेगळयाच वाटा
काटा रुतलेला, अजुनही मनात आहे
शोधतात डोळे पुन्हा त्या छबिला
आस तुझी, आजही प्रत्येक क्षणात आहे
“ती"च्या करता काही कविता
१) आभार आप्तस्नेहिचे आभार मानू नये,
असा संकेत आहे पण म्हणतात ना
प्रेमात सारे क्षम्य असते
म्हणून हा शब्द प्रपंच
प्रिये आभार, शतश: आभार
कारण तुझ्याचमुळॆ मला कळले
मी तरुण झालो आहे!
यौवनात आलो आहे!
(२) अव्यक्त
“अग तुला माहित आहे का,
हे बघ मी तुला आपल्या पापण्यात बंद केले आहे “
“चल वेड्या उगीच flirt करू नको
चष्मा घालून उभा आहेस
आणि म्हणतो पापण्यात बंद केले आहे”
(मी flirt करत नाही ग. मला काय म्हणायचे ते डोळ्यांना सांगता येत नसेल पण कधी माझ्या ह्रुदयाचा कानोसा घे ना माझ्या छातिला कान लावून बघ तेव्हा तुला क ळॆल की माझ्या स्पंदनत तुझ्याच नावाचा निनाद आहे तेव्हा तर खत्री पटेल ना?)
(३) विरह
तुझ्यापेक्षा, कधी कधी तुझा
विरह हवाहवासा वाटतो
जेव्हा भेटतो, तू असते
एकाच ठिकाणी, माझ्या डॊळ्यासमोर
आणि जेव्हा तू नसतेच
जळी, स्थ ळी, काष्ठी, पाषाणी
तुझाच निवास असतो
१) आभार आप्तस्नेहिचे आभार मानू नये,
असा संकेत आहे पण म्हणतात ना
प्रेमात सारे क्षम्य असते
म्हणून हा शब्द प्रपंच
प्रिये आभार, शतश: आभार
कारण तुझ्याचमुळॆ मला कळले
मी तरुण झालो आहे!
यौवनात आलो आहे!
(२) अव्यक्त
“अग तुला माहित आहे का,
हे बघ मी तुला आपल्या पापण्यात बंद केले आहे “
“चल वेड्या उगीच flirt करू नको
चष्मा घालून उभा आहेस
आणि म्हणतो पापण्यात बंद केले आहे”
(मी flirt करत नाही ग. मला काय म्हणायचे ते डोळ्यांना सांगता येत नसेल पण कधी माझ्या ह्रुदयाचा कानोसा घे ना माझ्या छातिला कान लावून बघ तेव्हा तुला क ळॆल की माझ्या स्पंदनत तुझ्याच नावाचा निनाद आहे तेव्हा तर खत्री पटेल ना?)
(३) विरह
तुझ्यापेक्षा, कधी कधी तुझा
विरह हवाहवासा वाटतो
जेव्हा भेटतो, तू असते
एकाच ठिकाणी, माझ्या डॊळ्यासमोर
आणि जेव्हा तू नसतेच
जळी, स्थ ळी, काष्ठी, पाषाणी
तुझाच निवास असतो
Wednesday, April 23, 2008
बालहट्ट
पापा घेउन दया मला लाल लाल फुगा
मोठ्या मोठ्या चांदण्याचा निळाशार झगा
गोबर्या गोबर्या गालाचा किती सुंदर टेडी
रिमोट दाबताच फ़र फ़र करत विमान हे उडी
शेजारच्या पिंकीकड़े आहे असाच घोडा
स्प्रिंगसारखा नाचतो यो यो, हळूच त्याला सोडा
बार्बी साथी शोधू का रे दॆखणासा सगा
चला जाऊ बागेत, तेथे आहे झुला
बदका सोबातच्या शर्यतित जिंकायचे मला
गार गार आईस्क्रिमची मज्जा आहे खास
गरम गरम पॉपकॉन्रचा येतो आहे वास
टांगेवाले काका आहेत का ? हे जरा बघा
खोट नका सांगू, तुला आज होती सुट्टी
तक्रार नका करू, नाही हो मी हट्टी
देते चॉकलॆटची पप्पी, तुझी मी रे साय
कडेवर घे आता, थकले माझे पाय
रात्री गोष्ट सांगत नेशील ना परिंच्या जगा
मोठ्या मोठ्या चांदण्याचा निळाशार झगा
गोबर्या गोबर्या गालाचा किती सुंदर टेडी
रिमोट दाबताच फ़र फ़र करत विमान हे उडी
शेजारच्या पिंकीकड़े आहे असाच घोडा
स्प्रिंगसारखा नाचतो यो यो, हळूच त्याला सोडा
बार्बी साथी शोधू का रे दॆखणासा सगा
चला जाऊ बागेत, तेथे आहे झुला
बदका सोबातच्या शर्यतित जिंकायचे मला
गार गार आईस्क्रिमची मज्जा आहे खास
गरम गरम पॉपकॉन्रचा येतो आहे वास
टांगेवाले काका आहेत का ? हे जरा बघा
खोट नका सांगू, तुला आज होती सुट्टी
तक्रार नका करू, नाही हो मी हट्टी
देते चॉकलॆटची पप्पी, तुझी मी रे साय
कडेवर घे आता, थकले माझे पाय
रात्री गोष्ट सांगत नेशील ना परिंच्या जगा
Tuesday, April 22, 2008
Mobile प्रेम
Mobile प्रेम
मी नेहमी सारखा bus stop वर उभा होतो.
ती आली आणि नजर तिच्यावरच रुतून बसली.
Nokia-connecting people अशी जाहिरात असणारे hoarding
कोणीतरी bus stop वर लावत होते.
ती रोजच bus stop वर दिसयाची
polytonic ringtone सारखी खदखदून हसायची
एकदिवस bus मध्ये चक्क माझ्या शेजारी बसली
नाव विचरायला विसरलो पण mobile numbers exchange केले
तिचे हसणे, तिचे दिसने हृदयात download होत गेले
डोळ्याच्या bluetooth मधून मिही काही messages send केले
sms ची देवाणघेवाण होत गेली
special rate च बहाणा करत call duration वाढत गेली
मनाच्या धुंदीत येणा अशी caller tune set झाली
मित्र चिडवायाचे, यार तू एकदम charged दिसतो
mobile ऐटित दाखवत मी म्हणायचो,
एक idea जो बदल दे आपकी जिन्दगी
एकदा ती म्हणाली, ये तुझा photo mms कर ना
मी म्हणालो,अग ती facility माझ्या phone मध्ये नाही आहे.
दहा हजाराच्या पगारात एवढा महागडा phone मला कुठे परवडॆल.
त्या दिवशी ती बोललीच नाही
पुढे काही दिवस ती silent mode वरच होती
sms केले, miscall मारून बघितले पण no reply
नंतर तिचे bus stop वर येणेही बंद झाले
number try केला पण ती 'out of reach' होती
एकदिवस अचानक ती mall मध्ये दिसली. कोणीतरी तिच्या सोबत होते
त्याच्या एका हातात तिचा हात होता तर दुसर्या हातात महगडा N-95 होता
low battery चा signal माझ्या mobile मध्ये वाजू लागला
२-३ दिवस network down होते
बाजुचा agent म्हणाला साब नया scheme आया है
instrument के साथ है. sms, mms, FM, GPRS, STD सब कुछ है.
मी उपरोधाने विचारले, फ्री में मिलगा क्या?
तो म्हणाला, सब कुछ मिलेगा, पर CONDITION APPLY
ते शब्द ‘सब कुछ मिलेगा, पर CONDITION APPLY ‘ कानात काही दिवस घुमत राहिले
जीवनातल्या या CONDITION आपण पुर्ण करू शकत नाही याची जाणीव होत होती
Balance नसलेला mobile घेउन मी bus stop वर उभा राहत होतो
कितीतरी दिवस त्याला recharge केले नाही. पुढे validity ही संपली
एकदिवस bus stop वर ह्या कूपन वर 16 digit PIN number कुठे असतो ?
असा मंजुळ आवाजात प्रश्न कानी पडला
मागॆ बघितलॆ तर नविन ती हॊती
mobile च्या सर्व खूबी मी तिला समजावून संगितल्या
ती रोजच bus stop वर भेटत गेली
तिच्या डोळ्यातील signal बघून मन पुन्हा vibrate व्हायला लागले
खुशित येवुन मीही नविन SIM टाकले
हे काय? मी तर hutch मगितले होते तुम्ही vodafone दिले, मी ओरडलो
agent म्हणाला, साब सिर्फ नाम बदला है, काम वही करेगा
खरच vodafone छान कंपनी आहे, तिचा आवाज स्पष्ट एकु येतो
Wherever you go our network follows
मी नेहमी सारखा bus stop वर उभा होतो.
ती आली आणि नजर तिच्यावरच रुतून बसली.
Nokia-connecting people अशी जाहिरात असणारे hoarding
कोणीतरी bus stop वर लावत होते.
ती रोजच bus stop वर दिसयाची
polytonic ringtone सारखी खदखदून हसायची
एकदिवस bus मध्ये चक्क माझ्या शेजारी बसली
नाव विचरायला विसरलो पण mobile numbers exchange केले
तिचे हसणे, तिचे दिसने हृदयात download होत गेले
डोळ्याच्या bluetooth मधून मिही काही messages send केले
sms ची देवाणघेवाण होत गेली
special rate च बहाणा करत call duration वाढत गेली
मनाच्या धुंदीत येणा अशी caller tune set झाली
मित्र चिडवायाचे, यार तू एकदम charged दिसतो
mobile ऐटित दाखवत मी म्हणायचो,
एक idea जो बदल दे आपकी जिन्दगी
एकदा ती म्हणाली, ये तुझा photo mms कर ना
मी म्हणालो,अग ती facility माझ्या phone मध्ये नाही आहे.
दहा हजाराच्या पगारात एवढा महागडा phone मला कुठे परवडॆल.
त्या दिवशी ती बोललीच नाही
पुढे काही दिवस ती silent mode वरच होती
sms केले, miscall मारून बघितले पण no reply
नंतर तिचे bus stop वर येणेही बंद झाले
number try केला पण ती 'out of reach' होती
एकदिवस अचानक ती mall मध्ये दिसली. कोणीतरी तिच्या सोबत होते
त्याच्या एका हातात तिचा हात होता तर दुसर्या हातात महगडा N-95 होता
low battery चा signal माझ्या mobile मध्ये वाजू लागला
२-३ दिवस network down होते
बाजुचा agent म्हणाला साब नया scheme आया है
instrument के साथ है. sms, mms, FM, GPRS, STD सब कुछ है.
मी उपरोधाने विचारले, फ्री में मिलगा क्या?
तो म्हणाला, सब कुछ मिलेगा, पर CONDITION APPLY
ते शब्द ‘सब कुछ मिलेगा, पर CONDITION APPLY ‘ कानात काही दिवस घुमत राहिले
जीवनातल्या या CONDITION आपण पुर्ण करू शकत नाही याची जाणीव होत होती
Balance नसलेला mobile घेउन मी bus stop वर उभा राहत होतो
कितीतरी दिवस त्याला recharge केले नाही. पुढे validity ही संपली
एकदिवस bus stop वर ह्या कूपन वर 16 digit PIN number कुठे असतो ?
असा मंजुळ आवाजात प्रश्न कानी पडला
मागॆ बघितलॆ तर नविन ती हॊती
mobile च्या सर्व खूबी मी तिला समजावून संगितल्या
ती रोजच bus stop वर भेटत गेली
तिच्या डोळ्यातील signal बघून मन पुन्हा vibrate व्हायला लागले
खुशित येवुन मीही नविन SIM टाकले
हे काय? मी तर hutch मगितले होते तुम्ही vodafone दिले, मी ओरडलो
agent म्हणाला, साब सिर्फ नाम बदला है, काम वही करेगा
खरच vodafone छान कंपनी आहे, तिचा आवाज स्पष्ट एकु येतो
Wherever you go our network follows
दर्वळू दे
दर्वळू दे
तुझे मऊसे हसणे ओठांनी पुसू दे
तुझा हात हातात असाच असू दे
नभात सजला चन्द्र पौर्णिमेचा
तुझ्या चांद्ण्यात मनसॊक्त भिजू दे
मनात उठती किती हे तरंग
अधीर या क्षणांना यौवनात रंगू दे
अबोल नयनांचा हा कसला लपंडाव
जवळ ये सखी,उष्ण श्वासान्नाच बोलू दे
गात्रांना असे ओढ रेशमी स्पर्श्य!ची
तन माझे तुझ्या सुवासात दर्वळू दे
तुझे मऊसे हसणे ओठांनी पुसू दे
तुझा हात हातात असाच असू दे
नभात सजला चन्द्र पौर्णिमेचा
तुझ्या चांद्ण्यात मनसॊक्त भिजू दे
मनात उठती किती हे तरंग
अधीर या क्षणांना यौवनात रंगू दे
अबोल नयनांचा हा कसला लपंडाव
जवळ ये सखी,उष्ण श्वासान्नाच बोलू दे
गात्रांना असे ओढ रेशमी स्पर्श्य!ची
तन माझे तुझ्या सुवासात दर्वळू दे
हायकु हा मुळत जापानी काव्य प्रकार. मला वाटते तेथल्या एका वाद्यावारून हे नाव आले आहे. हायकु हे ३ ओळींची कविता म्हणजे चारोळी पेक्षाही लहान. पहिल्या ओळीत ५, दुस-या ओळीत ७ आणि ३-या ओळीत ५ अक्षरे येतात ंहणजे एकुण १७अक्षरांची ही कविता. . अक्षरांच स्वातंत्र घेतल्या गेले. हया प्रकारात मराठीत शांता शेळकेनी काही कविता लिहिल्या होत्या. collage मधे असताना हा प्रकार मला खुप भावला होता. त्यांचे एक हायकु मला आजही आठवते.
कॉफीहाउस
प्रत्येक टॆबलाभोवती
स्वतंत्र पाऊस
साहित्यिकांच्या कॉफीहाउसमधे चालणार्या गप्पावर हे लिहिले होते. असेच तरल विषयांवर हायकु होताता. येथील चारोळ्या पाहून हायकु ची आठवण झाली. दिल्लीत मराठिचे संदर्भ ग्रंथ मिळने कठिन, त्यामुले जे आठवते तेच लिहिले. चुकभुल द्यावी घ्यावी. याला हायकु न म्हणता कोणी ३ ओळींची कविता म्हटले तरी चालेल.
वार्याचा प्रवास
हिरव्या गवाताच पात
हलवी निरोपाचा हात
थन्डिचा शहारा
कुशीत तिच्या
उबदार निवारा
मूसळाधार पाउस
त्रस्त ओलेचिम्ब गाव
ऐटीत कागदी नाव.
प्रणयाचा रंग
मिठित दोघे एकजीव
खजुराहोचे शिल्प सजीव
तुझ्या अश्रुंचा पाउस
फुलासारखे हसणे
सारे हावभाव जीवघेणे
कॉफीहाउस
प्रत्येक टॆबलाभोवती
स्वतंत्र पाऊस
साहित्यिकांच्या कॉफीहाउसमधे चालणार्या गप्पावर हे लिहिले होते. असेच तरल विषयांवर हायकु होताता. येथील चारोळ्या पाहून हायकु ची आठवण झाली. दिल्लीत मराठिचे संदर्भ ग्रंथ मिळने कठिन, त्यामुले जे आठवते तेच लिहिले. चुकभुल द्यावी घ्यावी. याला हायकु न म्हणता कोणी ३ ओळींची कविता म्हटले तरी चालेल.
वार्याचा प्रवास
हिरव्या गवाताच पात
हलवी निरोपाचा हात
थन्डिचा शहारा
कुशीत तिच्या
उबदार निवारा
मूसळाधार पाउस
त्रस्त ओलेचिम्ब गाव
ऐटीत कागदी नाव.
प्रणयाचा रंग
मिठित दोघे एकजीव
खजुराहोचे शिल्प सजीव
तुझ्या अश्रुंचा पाउस
फुलासारखे हसणे
सारे हावभाव जीवघेणे
मनात राम आहे?
मांडतो मी सितेच दुःख तळमळिनॆ
पण काय माझ्या मनात राम आहे?
लपवितॆ ती अश्रू तिचे
काय माझ्यातिल पुरुषाचे हे काम आहे?
करियर बद्दल तिला प्रोस्ताहन देतो
कधी कधी ऑफिसलाही ड्राप करतो
अवेळी कोणी घरी येता
स्वयंपाक कर असे तिलाच खुणावतो
घर ऑफिस ही कसरत का तिची अग्निपरिक्षाच आहे?
तसा मी खुल्या विचारांचा
आजही मित्र मैत्रिणी जमावितो
"हा कॉलेजचा मित्र आहे"
असे ती म्हणताच मी मात्र ओशाळतो
काय त्या धोब्यासारखाच माझा स्वभाव आहे?
नाच ग घुमा, मला उध्वस्त व्हायचे
मी आवडीने वाचतो
लग्नानंतर अशी परंपराच असते
असे म्हणत माझे आडनाव तिच्यावर लादतो
का'आहे मनोहर तरी' ही खंत तिच्याही मनात आहे?
वटपौर्निमेची मी खिल्ली उडवतो
कुठल्याही व्रताचा आग्रह नाही
स्थावर मालमत्ता तिच्या सल्याने घेतो
पण कागदावरअसते माझीच सही
हे तिचे घर की हा आसराच आहे?
मांडतो मी सितेच दुःख तळमळिनॆ
पण काय माझ्या मनात राम आहे?
लपवितॆ ती अश्रू तिचे
काय माझ्यातिल पुरुषाचे हे काम आहे?
करियर बद्दल तिला प्रोस्ताहन देतो
कधी कधी ऑफिसलाही ड्राप करतो
अवेळी कोणी घरी येता
स्वयंपाक कर असे तिलाच खुणावतो
घर ऑफिस ही कसरत का तिची अग्निपरिक्षाच आहे?
तसा मी खुल्या विचारांचा
आजही मित्र मैत्रिणी जमावितो
"हा कॉलेजचा मित्र आहे"
असे ती म्हणताच मी मात्र ओशाळतो
काय त्या धोब्यासारखाच माझा स्वभाव आहे?
नाच ग घुमा, मला उध्वस्त व्हायचे
मी आवडीने वाचतो
लग्नानंतर अशी परंपराच असते
असे म्हणत माझे आडनाव तिच्यावर लादतो
का'आहे मनोहर तरी' ही खंत तिच्याही मनात आहे?
वटपौर्निमेची मी खिल्ली उडवतो
कुठल्याही व्रताचा आग्रह नाही
स्थावर मालमत्ता तिच्या सल्याने घेतो
पण कागदावरअसते माझीच सही
हे तिचे घर की हा आसराच आहे?
Thursday, April 17, 2008
*** अपूर्ण मी ***
दूर आकाशात टीमटीमत आहे मी
घनदाट वनात वाट शोधत आहे मी
पाळण्यात झूलनार्या निरागस डोळ्यात आहे मी
प्रस्थापितानच्या विरोधतील बंड!त सामील मी
ज्वालामुखीच्या उद्रेक!तिल तप्त लाव्हा रस मी
कोसळणार्याच पावसाची तृषना भागवणारा मी
हळूच घे श्वास, तुज़या प्रत्येक श्वासात मी
जरी असलो कणाकणात, तुझ्याविना अपूर्ण मी
दूर आकाशात टीमटीमत आहे मी
घनदाट वनात वाट शोधत आहे मी
पाळण्यात झूलनार्या निरागस डोळ्यात आहे मी
प्रस्थापितानच्या विरोधतील बंड!त सामील मी
ज्वालामुखीच्या उद्रेक!तिल तप्त लाव्हा रस मी
कोसळणार्याच पावसाची तृषना भागवणारा मी
हळूच घे श्वास, तुज़या प्रत्येक श्वासात मी
जरी असलो कणाकणात, तुझ्याविना अपूर्ण मी
Subscribe to:
Comments (Atom)