पापा घेउन दया मला लाल लाल फुगा
मोठ्या मोठ्या चांदण्याचा निळाशार झगा
गोबर्या गोबर्या गालाचा किती सुंदर टेडी
रिमोट दाबताच फ़र फ़र करत विमान हे उडी
शेजारच्या पिंकीकड़े आहे असाच घोडा
स्प्रिंगसारखा नाचतो यो यो, हळूच त्याला सोडा
बार्बी साथी शोधू का रे दॆखणासा सगा
चला जाऊ बागेत, तेथे आहे झुला
बदका सोबातच्या शर्यतित जिंकायचे मला
गार गार आईस्क्रिमची मज्जा आहे खास
गरम गरम पॉपकॉन्रचा येतो आहे वास
टांगेवाले काका आहेत का ? हे जरा बघा
खोट नका सांगू, तुला आज होती सुट्टी
तक्रार नका करू, नाही हो मी हट्टी
देते चॉकलॆटची पप्पी, तुझी मी रे साय
कडेवर घे आता, थकले माझे पाय
रात्री गोष्ट सांगत नेशील ना परिंच्या जगा
Wednesday, April 23, 2008
Tuesday, April 22, 2008
Mobile प्रेम
Mobile प्रेम
मी नेहमी सारखा bus stop वर उभा होतो.
ती आली आणि नजर तिच्यावरच रुतून बसली.
Nokia-connecting people अशी जाहिरात असणारे hoarding
कोणीतरी bus stop वर लावत होते.
ती रोजच bus stop वर दिसयाची
polytonic ringtone सारखी खदखदून हसायची
एकदिवस bus मध्ये चक्क माझ्या शेजारी बसली
नाव विचरायला विसरलो पण mobile numbers exchange केले
तिचे हसणे, तिचे दिसने हृदयात download होत गेले
डोळ्याच्या bluetooth मधून मिही काही messages send केले
sms ची देवाणघेवाण होत गेली
special rate च बहाणा करत call duration वाढत गेली
मनाच्या धुंदीत येणा अशी caller tune set झाली
मित्र चिडवायाचे, यार तू एकदम charged दिसतो
mobile ऐटित दाखवत मी म्हणायचो,
एक idea जो बदल दे आपकी जिन्दगी
एकदा ती म्हणाली, ये तुझा photo mms कर ना
मी म्हणालो,अग ती facility माझ्या phone मध्ये नाही आहे.
दहा हजाराच्या पगारात एवढा महागडा phone मला कुठे परवडॆल.
त्या दिवशी ती बोललीच नाही
पुढे काही दिवस ती silent mode वरच होती
sms केले, miscall मारून बघितले पण no reply
नंतर तिचे bus stop वर येणेही बंद झाले
number try केला पण ती 'out of reach' होती
एकदिवस अचानक ती mall मध्ये दिसली. कोणीतरी तिच्या सोबत होते
त्याच्या एका हातात तिचा हात होता तर दुसर्या हातात महगडा N-95 होता
low battery चा signal माझ्या mobile मध्ये वाजू लागला
२-३ दिवस network down होते
बाजुचा agent म्हणाला साब नया scheme आया है
instrument के साथ है. sms, mms, FM, GPRS, STD सब कुछ है.
मी उपरोधाने विचारले, फ्री में मिलगा क्या?
तो म्हणाला, सब कुछ मिलेगा, पर CONDITION APPLY
ते शब्द ‘सब कुछ मिलेगा, पर CONDITION APPLY ‘ कानात काही दिवस घुमत राहिले
जीवनातल्या या CONDITION आपण पुर्ण करू शकत नाही याची जाणीव होत होती
Balance नसलेला mobile घेउन मी bus stop वर उभा राहत होतो
कितीतरी दिवस त्याला recharge केले नाही. पुढे validity ही संपली
एकदिवस bus stop वर ह्या कूपन वर 16 digit PIN number कुठे असतो ?
असा मंजुळ आवाजात प्रश्न कानी पडला
मागॆ बघितलॆ तर नविन ती हॊती
mobile च्या सर्व खूबी मी तिला समजावून संगितल्या
ती रोजच bus stop वर भेटत गेली
तिच्या डोळ्यातील signal बघून मन पुन्हा vibrate व्हायला लागले
खुशित येवुन मीही नविन SIM टाकले
हे काय? मी तर hutch मगितले होते तुम्ही vodafone दिले, मी ओरडलो
agent म्हणाला, साब सिर्फ नाम बदला है, काम वही करेगा
खरच vodafone छान कंपनी आहे, तिचा आवाज स्पष्ट एकु येतो
Wherever you go our network follows

दर्वळू दे
दर्वळू दे
तुझे मऊसे हसणे ओठांनी पुसू दे
तुझा हात हातात असाच असू दे
नभात सजला चन्द्र पौर्णिमेचा
तुझ्या चांद्ण्यात मनसॊक्त भिजू दे
मनात उठती किती हे तरंग
अधीर या क्षणांना यौवनात रंगू दे
अबोल नयनांचा हा कसला लपंडाव
जवळ ये सखी,उष्ण श्वासान्नाच बोलू दे
गात्रांना असे ओढ रेशमी स्पर्श्य!ची
तन माझे तुझ्या सुवासात दर्वळू दे
तुझे मऊसे हसणे ओठांनी पुसू दे
तुझा हात हातात असाच असू दे
नभात सजला चन्द्र पौर्णिमेचा
तुझ्या चांद्ण्यात मनसॊक्त भिजू दे
मनात उठती किती हे तरंग
अधीर या क्षणांना यौवनात रंगू दे
अबोल नयनांचा हा कसला लपंडाव
जवळ ये सखी,उष्ण श्वासान्नाच बोलू दे
गात्रांना असे ओढ रेशमी स्पर्श्य!ची
तन माझे तुझ्या सुवासात दर्वळू दे
हायकु हा मुळत जापानी काव्य प्रकार. मला वाटते तेथल्या एका वाद्यावारून हे नाव आले आहे. हायकु हे ३ ओळींची कविता म्हणजे चारोळी पेक्षाही लहान. पहिल्या ओळीत ५, दुस-या ओळीत ७ आणि ३-या ओळीत ५ अक्षरे येतात ंहणजे एकुण १७अक्षरांची ही कविता. . अक्षरांच स्वातंत्र घेतल्या गेले. हया प्रकारात मराठीत शांता शेळकेनी काही कविता लिहिल्या होत्या. collage मधे असताना हा प्रकार मला खुप भावला होता. त्यांचे एक हायकु मला आजही आठवते.
कॉफीहाउस
प्रत्येक टॆबलाभोवती
स्वतंत्र पाऊस
साहित्यिकांच्या कॉफीहाउसमधे चालणार्या गप्पावर हे लिहिले होते. असेच तरल विषयांवर हायकु होताता. येथील चारोळ्या पाहून हायकु ची आठवण झाली. दिल्लीत मराठिचे संदर्भ ग्रंथ मिळने कठिन, त्यामुले जे आठवते तेच लिहिले. चुकभुल द्यावी घ्यावी. याला हायकु न म्हणता कोणी ३ ओळींची कविता म्हटले तरी चालेल.
वार्याचा प्रवास
हिरव्या गवाताच पात
हलवी निरोपाचा हात
थन्डिचा शहारा
कुशीत तिच्या
उबदार निवारा
मूसळाधार पाउस
त्रस्त ओलेचिम्ब गाव
ऐटीत कागदी नाव.
प्रणयाचा रंग
मिठित दोघे एकजीव
खजुराहोचे शिल्प सजीव
तुझ्या अश्रुंचा पाउस
फुलासारखे हसणे
सारे हावभाव जीवघेणे

मनात राम आहे?
मांडतो मी सितेच दुःख तळमळिनॆ
पण काय माझ्या मनात राम आहे?
लपवितॆ ती अश्रू तिचे
काय माझ्यातिल पुरुषाचे हे काम आहे?
करियर बद्दल तिला प्रोस्ताहन देतो
कधी कधी ऑफिसलाही ड्राप करतो
अवेळी कोणी घरी येता
स्वयंपाक कर असे तिलाच खुणावतो
घर ऑफिस ही कसरत का तिची अग्निपरिक्षाच आहे?
तसा मी खुल्या विचारांचा
आजही मित्र मैत्रिणी जमावितो
"हा कॉलेजचा मित्र आहे"
असे ती म्हणताच मी मात्र ओशाळतो
काय त्या धोब्यासारखाच माझा स्वभाव आहे?
नाच ग घुमा, मला उध्वस्त व्हायचे
मी आवडीने वाचतो
लग्नानंतर अशी परंपराच असते
असे म्हणत माझे आडनाव तिच्यावर लादतो
का'आहे मनोहर तरी' ही खंत तिच्याही मनात आहे?
वटपौर्निमेची मी खिल्ली उडवतो
कुठल्याही व्रताचा आग्रह नाही
स्थावर मालमत्ता तिच्या सल्याने घेतो
पण कागदावरअसते माझीच सही
हे तिचे घर की हा आसराच आहे?

Thursday, April 17, 2008
*** अपूर्ण मी ***
दूर आकाशात टीमटीमत आहे मी
घनदाट वनात वाट शोधत आहे मी
पाळण्यात झूलनार्या निरागस डोळ्यात आहे मी
प्रस्थापितानच्या विरोधतील बंड!त सामील मी
ज्वालामुखीच्या उद्रेक!तिल तप्त लाव्हा रस मी
कोसळणार्याच पावसाची तृषना भागवणारा मी
हळूच घे श्वास, तुज़या प्रत्येक श्वासात मी
जरी असलो कणाकणात, तुझ्याविना अपूर्ण मी

Subscribe to:
Comments (Atom)