Wednesday, June 4, 2008

तळमळ
तळमळ - माझ्या मुली करता एक साधी कविता
छ्कुली रडू नकोस ग!
बघ मला ऑफिसला वेळ होतोय
रडतेस तू आणि हुंदका मला येतोय......
किती ताकद आहे या कोवळ्या बेड्यात
तुझी मिठी सोडवली पण पाऊल उचलतच नाही....
मला ही वाटते ऑफिसला दांडी मारून तुझ्या सोबत खेळावे
साखरेचे पोत करत तुला खूप हसवावे
पण .......

मला जावेच लागेल
मला तुझ्या भविष्याची चिंता आहेच
पुस्तके, कपडे, अन्न या सर्वांचीच
किंमत असते हे समजते मला
पण हे लंगडे समर्थन आहे.
प्रश्न केवळ पैशाचा
नाही रोज रात्री कुशीत घेऊन तुला गोष्ट सांगतो
त्याची किंमत मला महिन्यात एकदाच
मिळनार्या पगारापेक्षा जास्त आहे.

माझे काम माझी अस्मिता आहे
तेच कसे सोडू ?..... "
सत्व" नसलेल्या पुरुषाला
पुढे तुला पापा म्हणायचिही लाज वाटेल.
हे मला कळत पण.... वळत नाही
आणि तुला .....?
आज हे कळनार नाही
पण मोठी झाल्यावर हे जरुर हे वाच
मग एक पित्याची तळमळ तुला
कळॆल तेव्हा कदाचित तू मला माफही करशील

No comments: