***आंक्रदन (मराठी गझल)***
रात पुनवेची, तरी अंधार का ?
मास वसंताचा, सुका बहार का ?
साथ मज देशी हरेक वेळ रे
हाय हुंदका, आज तू गद्दार का ?
घाव हृदयाचे अजून बोलके
भाग्य करते ते पुन्हा प्रहार का ?
पाय जमिनिशी इमान राखती
वांझ नशिबी हातही उधार का
Thursday, April 17, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment